बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांंची आ.खडसे यांनी घेतली भेट

0
चाळीसगाव | प्रतिनिधी :  तालुक्यातील वरखेडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटूंबीयाची बुधवारी माजी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली. यावेळी मयतांच्या कुटूंबीयाना शासनाकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीबाबत माहिती दिली. तसेच वरखेडे परिसरात २४ तास लाईन राहवी याबाबत महावितरणच्या मुख्यअंभियंतेशी बोलणार असल्याचे सांगीतले.

आ. खडसे हे पहाटे पाच वाजता येथील शासकिय विश्रामगृह येथे आले. सकाळी ८.३० वाजता वरखेडे येथे पोहचले. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेले वरखेडे येथील जगताप, माळी व तिरमली यांच्या कुटूंबियाची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थानी त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला, व बिबट्याचा बंदोेबस्त व गावात २४ तास लाईट राहावी अशी मागणी केली.आ.खडसेंनी ग्रामस्थांना लाईन बाबत आश्‍वासन दिले.

तसेच मयताच्या कुटूंबियाना शासकिय ८ लाख रुपये मिळणार्‍या मदतीबाबत माहिती दिली. वनआधिकार्‍यांशी चर्चा करुन बिबट्या मारण्याचे आदेश आहेत का नाही, याची माहिती घेतली. यावेळी वनविभागाच्या आधिकार्‍यांनी आम्ही बिबट्या शोधण्यासाठी जातोे, त्यावेळी ग्रामस्थांची गर्दी खूप होत असल्याची समस्या मांडली.

आ.खडसे यांच्यासोबत जेष्ठ नेते वाडीलाल राठोड, मा.आ.साहेबराव घोडे, कैलास सुर्यवंशी, यु.डी.माळी, शेषराव पाटील, नगरसेवक सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी, मा.जि.प.सद्स्या राजेंद्र राठोड, श्री सोनवणे, अरुण पाटील, राकेश नेवे आदि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बायपास जवळील शेतात बिबट्याचे दर्शन

शहरापासून जवळच असलेल्या कन्नड बायपास जवळ एका शेतामध्य बुधवारीे महिलेने बिबट्या व त्यांचे पिल्लु हे शेतात जाताना पाहिले. महिलेने याबाबतची माहिती बायपास येथील वाहतुक पोलीसांना दिली, घटनास्थळी आमदारांसह वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.

कन्नड बायपास जवळ कोदगाव शिवारात शिवसेनेचे रमेश चव्हाण यांचे शेत आहे. बुधवारी रमेश आबा यांच्या शेताजवळच असलेल्या एका शेतात शिंदुबाई कोळी यांना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बिबट्या व एक बच्छडा बाधावरील रस्त्यावरुन जातात दिसला.

शिंदुबाई ह्या लगेच पळत-पळत बायपासवरील मुख्य रस्त्यावर आल्यावर ह्या घटनेची माहिती वाहुतक पोलीसाला दिली. पोलिसानी लगेच वनविभागाला याची माहिती दिली, घटनास्थळी आमदार उन्मेष पाटील, प्रातांधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

परंतू तो पर्यंत बिबट्या कोंदगाव धरणाकडे निघुन गेला होता. परंतू हा बिबट्या नरभक्षक नसून पाटणादेवी जंगलातील असल्याचे संशय व्यक्त करण्यात आला.

बिबट्याकडुन बोकड्या फस्त

वरखेडे शिवरात नुकत्याच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या दिपाली जगताप यांच्या घरासमोरुन, बुधवारी मद्यरात्री बिबट्याने पुन्हा बोकट उंचलुन नेऊन फस्त केला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आह

LEAVE A REPLY

*