अमळनेरात अवैध धंद्यांविरुध्द कार्यवाही

0
अमळनेर, | प्रतिनिधी : शहरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने देशीदारुची अवैध विक्री व सट्टा जुगाराविरुध्द कारवाई केली.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल कुराडे यांना मिळालेल्या माहितीचे आधारे सहा.पोलिस.निरिक्षक रविंद्र बागुल, तसेच सहा.फौ.निळकंठ पाटील, पो.हे.कॉ.शशिकांत पाटील, चालक दिपक पाटील यांचे पथकाला कार्यवाही करणे कामी योग्य त्या सुचना दिल्या.

पथकाने अमळनेर शहरात येऊन योग्य ती माहीती काढुन जुन्या बस स्टॅन्डचे पाठीमागे विक्की शांतीलाल लोहार (३० रा.झामी चौक) हा गैरकायदेशिर रित्या बिनापरवाना २४९६ रुपये किंमतीची देशीदारु बाळगताना मिळुन आला. त्याचेविरूद्ध अमळनेर पो.स्टे प्रो.गुन्हा रजि.नं ३१२६/२०१७ मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास मुद्देमालसह अमळनेर पो.स्टे.ला हजर केले.

तसेच प्रल्हाद छबा वानखेडे (४४, रा. गांधलीपुरा, अमळनेर) हा कल्याण मटका सट्टा जुगाराची साधने व रोख रक्कम ११०५ सह मिळुन आल्याने त्याचेविरुध्द अमळनेर पो.स्टे भाग ६ गु.र.नं. ६०६३ /२०१७ मुबंई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*