Type to search

राहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

राहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

Share

नवी दिल्ली  : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबात अनुद्गार काढल्याचे सांगत, राष्ट्रीय महिला आयोगानं राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केलं आहे’, असं वक्तव्य राहुल यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना केलंय.

राहुल गांधी यांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून हे वक्तव्य केल्याचं म्हणत, आयोगानं राहुल यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का, असा सवाल करत, राहुल गांधींचं वक्तव्य महिलांची निंदा करणारं आणि अपमानजनक असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांना नोटीस पाठवून या वक्तव्यामागं त्यांचा काय उद्देश आहे, याचं आयोगानं स्पष्टीकरण मागवलं असल्याचंही शर्मा म्हणाल्या.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!