दहावी – बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0
पुणे | प्रतिनिधी :  राज्यात फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये होणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा होईल. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेआधी मंडळातर्फे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार आहे.

परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

LEAVE A REPLY

*