जळगावातील अतिक्रमण १५ डिसेंबरपर्यंत काढण्याचे आदेश

0
जळगाव | प्रतिनिधी :  महानगरपालिकेकडून अतिक्रमण निर्मूलनासाठी नो हॉर्कर्स झोनमध्ये धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश अतिक्रमण निर्मुलन विभागाला देण्यात आले आहेत.

प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आज मनपाच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला अप्पर आयुक्त राजेश कानडे हे देखील उपस्थित होते. मनपा प्रशासनाकडून शहरातील ‘नो हॉकर्स’ झोन मध्ये २१ नोव्हेंबरपासून सुरु केलेली मोहिम अधिक तीव्र करण्यात येण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले.

नो हॉकर्स मझोन प्रमाणे अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आलेले सर्व अतिक्रमण काढण्याचेही सांगण्यात आले आहे.

मनपाने ही मोहिम २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान सुरु केली होती. मात्र त्यात पाच दिवसांची मुदतवाढ करून ३० नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमण मोहिम राबविली जाणार असल्याचे सांगितले होते.

मात्र आता १५ डिसेंबरपर्यंत ही मोहिम सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच भजेगल्लीतील अतिक्रमण काढण्याचेही आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

*