हाफिज सईदला अनेकवेळा भेटलो : परवेझ मुशर्रफ

0
मुंबई : हाफिद सईदला अनेकवेळा भेटालो असून मी लष्कर -ए- तोयबाचा चाहता असल्याचे विधान पाकिस्थानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्थानातील एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले आहे.

वृत्तवाहिनीच्या निवेदकाने लष्कर – ए – तोयबा व मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईद व त्याच्या कारवायांबाबत विचारले असता मी सईदला अनेकवेळा भेटलो आहे. काश्मीरमध्ये तो करत असलेल्या अतिरेकी कारवायांचे मी समर्थन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

परवेझ मुशर्रफ यांच्या या कबुलीनाम्यामुळे पाकिस्थान दहशतवाद्यांना खतपाणी घालत असून भारतात दहशतवादी कारवायांसाठी रसद पुरवत असल्याचे सिध्द होत आहे. परवेझ मुशर्रफ यांच्या या विधानाची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*