हाफिज सईदचे युनोला साकडे ‘माझे नाव हटवा‘

0

मुंबई : मी दहशतवादी नाही. त्यामुळे माझे नाव दशतवाद्यांच्या यादीतून हटावा असे साकडे मुंबईतील २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदने युनोकडे एका याचीकेव्दारे टाकले आहे.

हाफिजने लाहोरमधील मिर्जा ऍण्ड मिर्जा कंपनीमार्फेत ही याचीका दाखल केली आहे.

पाकिस्थान दहशतवाद्यांच्या पाठिशी

मुुंबई हल्ल्याला ९ वर्ष पूर्ण होण्याच्या पुर्वसंधेलाच पाकिस्थानने हािॐजची नजरकैदेतून मुक्तता केली. त्यामुळे पाकिस्थानने भारताच्या जखमेवर मिठ चोळले आहे. शहीदासह या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या भावनांशी क्रुरतेने खेळला आहे. पाकिस्थानने सुटका केल्यानंतर हाफिज हल्ल्याच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्ताने पीओके (पाकव्यात भारत)ला जाणार आहे.

युनोच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान हाफिजने दाखल केलेल्या याचीकेनुसार जर त्याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीतून कमी केले तर ती भारतासाठी मोठे धोकेदायक ठरणार आहे. कारण यामुळे पाकिस्थान दहशतवाद्यांना खतपाणी घालत असण्याच्या भारताच्या भूमिकेवर तो मोठा वार होईल. आणि पर्यायाने सर्वच दहशतवादी निर्दोष सुटत भारतात पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भिती व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*