घरकुलांसाठी 28 कोटीचा प्रस्ताव – दिवेगावकर

0

जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-केंद्रशासनाच्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो.

आगामी वर्षात तयार करण्यात येणार्‍या जिल्ह्यातील 6 हजार घरकुलांसाठी 28 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून येणार्‍या डिपीडीसीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

गरीबांना हक्काचे घर मिळावे व 2022 पर्यंत कुणीही हक्काच्या घरापासून वंचित राहु नये यासाठी लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून 1 लाख 20 हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

त्यात एस.टी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 3350 घरकुलांचे उदिष्ट यावर्षी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने निश्चित केले आहे.

यासाठी 17 कोटीची मागणी केली जाणार असुन यात केंद्राकडून 60 टक्के प्रमाणे प्रत्येक घरासाठी 72 हजार मिळणार आहे.

तर जिल्ह्यातील डीपीडीसीमधुन उर्वरीत 40 टक्के रकमेचा प्रस्ताव सादर केला जाणार असुन त्यास मंजुरी घेतली जाणार आहे.

तसेच एस.सी. लाभार्थ्यांना देखील या घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी यावर्षी 2800 घरकुलांचे उदिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी 11 कोटीचा प्रस्ताव आहे.

त्यानुसार 40 टक्के रक्कम डीपीडीसीतुन उपलब्ध होण्यासाठी हा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दि.4 रोजी मंजुर केला जाणार असल्याचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्‍या अभियंत्यांवर होणार कारवाई
जिल्ह्यातील 54 पाणी योजनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गेल्या आठवड्यातच देण्यात आले आहे. तात्काळ गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू करण्याचे आदेश संबधीत अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

जे अधिकारी अथवा अभियंता फिर्याद देण्यास टाळाटाळ करतील अशा अभियंत्यावर लक्ष असुन त्यांनी फिर्याद न दिल्यास ऑनलाईन पध्दतीने फिर्या दाखल केली जाईल, तसेच टाळटाळ करणार्‍या अभियंत्यांवर कारवाईचे संकेत आज सीईओंनी दिले आहे.

LEAVE A REPLY

*