वरणगाव नगराध्यक्षपदी भाजपाचे सुनील काळे

0

वरणगाव, ता.भुसावळ । दि.28 । वार्ताहर-वरणगाव नगरपरिषदेच्या दि.28 नोव्हेंबर 2017 रोजी झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत अपक्षांसहीत सर्व पक्षाच्या अकरा नगरसेवकांनी सुनिल काळे यांना नगराध्यक्ष पदासाठी तर शेख अखलाक यांना उपनगराध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान केल्याने अखेर सुनिल काळे यांची नगराध्यक्षपदी व उपनगराध्यक्षपदी शेख अखलाक यांनी निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी यांनी घोषीत केले.

गेल्या पंधरा दिवसांपासुन वरणगाव शहरात नगरपरीषद नगराध्यक्ष – उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीला राजकिय पक्षांच्या घडामोडी सुरु होत्या.

या घडामोडींना अखेर पूर्ण विराम मिळाला असुन नगराध्यक्षपदी सुनिल काळे यांची निवड झाली आहे. दि. 28 रोजी सकाळी 10.30 वाजता सुनिल काळे यांचा गट तर रोहीणी जावळे यांचा गट 10.52 वाजता सभागृहात दाखल झाले.

निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणुन भुसावळ प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मुख्यधिकारी प्रशांत सरोदे होते.

सुरूवातीला पिठासीन अधिकार्‍यांनी निवडणुकीचे नियम वाचुन सांगीतले, ही निवडणुक पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत येत असल्याने गुप्त मतदान घेता येत नाही, त्यामुळे हात वर करून मतदान करण्यात येईल.

पुढील प्रक्रीयेत सुरूवातीला एका गटाचे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रोहीणी जावळे यांना भाजपाच्या सौ. अरुणा इंगळे, जागृती बढे, विकीन भंगाळे, नितीन माळी तसेच अपक्ष वैशाली देशमुख, गणेश धनगर व स्वतः रोहीणी जावळे अशी एकुण सात मते मिळाली.

तर दुसर्‍या गटाचे दावेदार सुनिल काळे यांना भाजपाच्या सौ.माला मेढे, नसरीन बी साजीत कुरेशी आणि स्वतः सुनिल काळे, राष्ट्रवादीचे राजेंद्र चौधरी, विष्णु खोले, रविंद्र सोनवणे, गणेश चौधरी, सौ.प्रतिभा चौधरी, शिवसेनेच्या सौ.शशी कोलते, अपक्ष शेख अखलाक, महेनाज बी पिंजारी अशी अकरा मते मिळाली.

यामुळे सुनिल काळे यांना अकरा मते मिळाल्याने पिठासीन अधिकारी श्री.चिंचकर यांनी त्यांना विजयी घोषीत केले. तर उपनगराध्यक्षपदी शेख अखलाक यांना अकरा मते मिळाल्याने पुन्हा त्यांचीच वर्णी उपनगराध्यक्षपदी लागली.

यावेळी निवडणुक कामी गंभीर कोळी, संजय माळी आदी कर्मचार्‍यांनी सहकार्य केले तर उप विभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगावचे एपीआय जगदीश परदेशी, हेमंत कडोकार, पीएसआय निलेश वाघ, पोकाँ सुनिल वाणी, नागेंद्र तायडे, कुलकर्णी, येवले सह मुक्ताईनगर व बोदवड येथील पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विजयी झाल्यानंतर सुनिल काळे यांनी सांगीतले की, गेल्या पंचविस वर्षापासुन सक्रीय राजकारणात असुन भाजपा पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे, मागील वेळी माझ्या आईला सरंपच पदाची हुलकावणी दिल्याने यावेळेस मी जिद्दीला पेटून सर्व पक्षीय अकरा नगरसेवकांच्या पाठींब्याने नगराध्यक्ष झालो. यापुढे कोणाचाही दबंगीरीला न जुमानता विकास हाच दृष्टकोन ठेवुन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*