प्रश्नमंजुषा स्पर्धेत पोदार, एसएलसी स्कूलचे विद्यार्थी विजेते

0

जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-जैन महिला मंडळ व जैन प्रेरणा मंडळातर्फे आयोजित आणि एमको फाऊंडेशनतर्फे प्रायोजित ‘कोन बनेगा जिनीयस’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल आणि एसएलसी शाळेचे विद्यार्थी विजेते ठरले.

प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.सुरेशदादा जैन, बेंडाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.राणे उपस्थित होते.

प्रारंभी प्रकल्प प्रमुख निता जैन यांनी उपस्थित मान्यवरांना प्रश्न विचारुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या लेखी परिक्षेसाठी 18 शाळेतील 36 विद्यार्थी सहभागी झाले होते.

लेखी परिक्षेत सेंट जोसेफ, सेंट टेरेसा, रुस्तमजी, पोदार, ओरियन, एसएलसी आणि रायसोनी शाळेतील विद्यार्थी पात्र ठरले. सात शाळेतील 14 विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली.

यात पोदार आणि एसएलसी शाळेच्या विद्यार्थ्यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. प्रत्येकी 4 हजार रुपये रोख, मेडल आणि सन्मान चिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप होते.

तसेच उर्वरित पाच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील रोख 700 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाला रत्नाभाभी जैन, कमला अग्रवाल, शैला मयुर, अनिता कांकरिया, प्रेमलता डाकलिया, स्वाती पगारिया, मंगला गांधी, दिपा राखा, लता बनवट, मनिषा डाकलिया आदी उपस्थित होत्या. सुशिल राका यांनी स्वॉफ्टवेअर तयार केले होते.

LEAVE A REPLY

*