क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

0

जळगाव । दि.28 । क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 127 व्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रमाद्वारे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

नवीन माध्यमिक विद्यालय

प्रगती शिक्षण मंडळ संचलित नवीन माध्यमिक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका शालिनी अंगाळे, डॉ.रविंद्र माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. यशस्वतीेसाठी निलेश नाईक, संगीता निकम, सुवणर्श सोनार यांनी परिश्रम घेतले.

आई जिजाऊ माता रमाई फाऊंडेशन

आई जिजाऊ माता रमाई फाऊंडेशनच्या कार्यालयात महात्मा फुले यांचे स्मृती दिनानिमित्त फाऊंडेशनच्या कार्यालयात महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले यांचे प्रतिमेला निलेश सपकाळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यशस्वीतेसाठी आई जिजाऊ, माता रमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत शिरसाठ, रामलाल पवार, सचिन पाटील, संजय अहिरे, कृष्णा तायडे, ईश्वर ढिवरे, दिलीप नेटके, रुपाली पवार, मनिषा पाटील, सोनाली सपकाळे उपस्थित होते.

स्व.शेठ बी.एम.जैन विद्यालय

दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था जळगाव संचलित स्व.शेठ बी.एम.जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक भास्कर फुलपगार यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्व प्रथम प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पार्पण करण्यात आले. सुत्रसंचलन संगीता निकम यांनी केले. तर आभार भारती सोनवणे यांनी मानले.

रिपाइं (आठवले गट)

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त फुले मार्केट येथील त्यांच्या पुतळ्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रताप बनसोडे, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, बापू धामणे, गणेश भालेराव, किरण अडकमोल, दिपक बाविस्कर, खंडू महाले, अविनाश सोनवणे, प्रतिभा भालेराव, हरिष शिंदे, बबलु भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराणा प्रताप विद्यालय

दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कनिष्ठ विभागातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.गजेंद्र पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रा.संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंचा जीवनपट उलगडून दाखविला. सुत्रसंचलन प्रा.किरण पाटील यांनी तर आभार प्रा.साहेबराव पाटील यांनी मानले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयात उपमुख्याध्यापक डी.एस.पाटील, पर्यवेक्षक बी.डी.सोनावणे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सत्यशोधक चित्रपट दाखविण्यात आला.

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय

का.उ.कोल्हे विद्यालयात महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.ए.पाटील यांनी केले. प्रतिमापूजन व अध्यक्षीय भाषण उपमुख्याध्यापक ए.व्ही.ठोसर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आभार एस.एम.खडके यांनी मानले. कार्यक्रमास एच.जी.काळे, एस.डी.खडके यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

भाऊसाहेब राऊत विद्यालय

भाऊसाहेब राऊत विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.आर.कोळी तर प्रमुख अतिथी म्हणून एल.एस.तायडे, एस.एस.अत्तरदे, ए.एस.बाविस्कर यांची उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक पी.आर.कोळी यांनी केले. सुत्रसंचलन व्ही.जे.कोळी यांनी केले. कार्यक्रमास एस.आर.शिरसाटे, पी.व्ही.बाविस्कर, पी.बी.मेंढे, राजेश जाधव शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

रत्ना जैन प्राथमिक विद्यालय

दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित प्रतापनगर येथील रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात स्व.शेठ भिकमचंद जैन सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक उत्तम चौधरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सुत्रसंचलन शैलेश शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमात निशिगंधा पाटील, मिना गांधलीकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आभार रामकृष्ण कोल्हटकर यांनी मानले.

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशन

महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे महात्मा फुले यांच्या प्रतिमेस झोनल मॅनेजर अविनाश कनिकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सुनिल वाणी, धिरज कुमार, गुलाब मोरे, मनोज चांगरे, मधु बाविस्कर, एम.जी.कुळकर्णी, मोहन खेवलकर, सुनिल कानळदेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*