शिओमीच्या मेड इन इंडिया पॉवरबँक

0
स्मार्टफोन कंपनी असलेल्या शिओमी कंपनीने कमी वेळात आपले स्थान भारतात निर्माण केले आहे. शिओमी कंपनीचे दोन प्लांट सुरू असून यामध्ये आणखी एका प्लांटची भर पडली आहे.

कंपनीने पॉवर बँक तयार करण्यास सुरुवात केली असून पॉवरबँक देखील बाजारपेठेत लॉंच केले आहे. शिओमी कंपनीचे पॉवर बँकचा हा प्लांट नोएडामध्ये सुरु केला आला असून यासाठी कंपनीने आणखी एका टेक्नॉलॉजी कंपनीशी करार केला आहे. या प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सात मिनीट एक पॉवरबँक तयार केली जात आहे.

एमआय पॉवरबँक २ आय असे या पॉवरबँकचे नाव असून दोन वेगवेगळया प्रकारात बाजारापेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. एक पॉवरबँक १० हजार मिलिऍम्पियर्सचा तर दुसरा २० हजार क्षमतेचा आहे.

१० हजार मिलिऍम्पियर्सच्या पॉवरबँकची किंमत ७९९ रुपये आहे. तर २० हजार क्षमतेची पॉवरबँक १ हजार ४९९ रुपयांमध्ये असून सर्व ठिकाणी शिओमीचे पॉवरबँक उपलब्ध असून ग्राहकांनी या पॉवरबँकला अधिक पसंती दिली आहे.

LEAVE A REPLY

*