नोकिया २ बाजारात दाखल

0
नोकया -२ बाजारपेठेत केवळ ६ हजार ९९९ रुपयांत तीन वेगवेगळया रंगात उपलब्ध आहे. नोकियाचा सर्वात कमी किंमतीच्या या स्मार्टफोनला ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली असून या नव्या स्मार्टफोनला ५ इंची एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

नोकियाच्या या नव्या स्मार्टफोनला १ जीबी रॅम व ८ जीबी स्टोरेज मेमरी असून १.३ कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, व ५ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनची ४ हजार ऍम्पीअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून दोन दिवस मोबाईलची बॅटरी चार्ज करावी लागणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.

स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकिया कंपनी मागे पडली होती परंतू मागील काही दिवसांत टप्प्या टप्प्याने नोकिया कंपनीने नोकिया ३ , नोकिया ५, नोकिया ६ बाजारपेठेत उपलब्ध करून पुन्हा भरारी घेतली होती. नोकीया -२ हा नवा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या रंगात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये असणार आहे.

LEAVE A REPLY

*