वरणगाव नगराध्यक्ष निवडणूकीत भाजपा फुटीच्या उबंरठ्यावर : गटनेतेपदी नितीन माळी

0
वरणगाव, |  अनिल पाटील :  वरणगाव नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक दि.२८ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे दोन नगरसेवक रिंगणात असल्याने भाजपात दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दुपारी २ वाजेपर्यंत वरणगाव नगर परिषद अध्यक्ष कोण? या विषयी अधिकृत घोषणा होईल.

वरणगाव नगरपरिषदेत दि. २७ रोजी माघारीच्या दिवशी नगराध्यक्ष निवडणूककरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीँकडून राजेंद्र चौधरी यांनी उमेदवारी दाखल केली होती. दि २७ रोजी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते राजेंद्र चौधरी यांनी नगराध्यक्षपदाचा भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला.

यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख संजीव कोलते व कार्यकर्ते सोबत होते. तर सुधाकर जावळे गटाचे व भाजपाचे नगरसेवक नितीन माळी यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता भाजपाचे दोन्ही उमेदवार सुनिल काळे व रोहीणी जावळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक रिंगणात असल्याने भाजपात दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे .

तर दि. २७ रोजी भाजपाच्या नगरध्यक्षा अरुणाबाई इगंळे, नगरसेवीका रोहीणी जावळे, जागृती बढे, नगरसेवक नितिन माळी, विकीन भंगाळे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे जावुन भाजपाचा नविन गट स्थापन केल्याने सुधाकर जावळे यांच्या नविन गटाचे गट नेते म्हणुन नितीन माळी यांची निवड करण्यात आली आहे.

आता भाजपात दोन गट निर्माण झाल्याने या दोघ गटांकडून परस्पर पक्षादेश / व्हिप भाजपाच्या नगरसेवकांना बजावल्याने आता कुणाचा गट नेता अधिकृत याचे दावे प्रतिदावे सुरू आहेत. नितीन माळी यांचे गटाकडे भाजपाचे पाच, अपक्ष गणेश धनगर, वैशाली देशमुख असे एकुण सात व सुनिल काळे यांचे गटाकडे भाजपाचे तिन, राष्ट्रवादीचे पाच, शिवसेना एक, अपक्ष शेख अखलाख, महेनाज बी पिंजारी असे अकारा नगरसेवक आहेत.

प्रदेश नेत्याच्या आदेशाने नविन गट
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनिल नेवे यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे भाजपाच्या नगरसेवकांचा नविन गट स्थापन करण्यात आला आहे.
नविन गटनेते – नितिन निवृत्ती माळी

LEAVE A REPLY

*