भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रेल्वेतर्फ नऊ विशेष गाड्या

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे आयोजित कार्यक्रमा दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेतला रेल्वे प्रशासनाने नागपुर ते दादर दरम्यान दि. ४ ते १८ डिसेंबर पर्यंत ९ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा तर दोन पॅसेंजर गाड्यांना दोन जनरल डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.

नागपूर-मुंबई दरम्यान- गाडी क्र ०१२६२ दि.४ रोजी रात्री ११.५५ वाजता नागपूर येथून रवाना होवून दि.५ रोजी दुपारी २.३५वाजता दादर पोहचेल ही गाडी पहाटे ५.५५ वाजता भुसावळ पोहचेल.

गाडी क्र.०१२६४ ही दि.५ डिसेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता नागपूर येथून रवाना होवून दि. ६ रोजी पहाटे १२.१० वाजता दादर पोहचेल.

ही गाडी भुसावळ स्थानकावरुन दुपारी १.५० वाजता सुटेल.गाडी क्र. ०१२६६ ही दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी ३.५५ वाजता नागपुर येथून रवाना होवून रात्री ११.४५ वाजता भुसावळ व दि. ६ रोजी सकाळी ११.३५ वाजता सीएसटीएम मुंबई पोहचेल.

या गाड्यांना १० जनरल व २ एसएलआर डबे असतील.या गाड्या भुसावळ विभागाती अकोला, जळंब, मलकापुर, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी स्थानकांवर थांबतील

पॅसेंजरला दोन डबे- दरम्यान, दि. ५ रोजी गाडी क्र. ५११५४ भुसावळ -मुंबई सीएसटीएम पॅसेंजर व दि. ७ रोजी गाडी क्र. ५११५३ मुंबई सीएसटीएम-भुसावळ पॅसेंजर या गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे जोडण्यात येतील.

मुंबई -नागपूर -गाडी क्र. ०१२४९ ही दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी ४.०५ वाजता मुंबई सीएसटीएम येथून रवाना होवून पहाटे १ वाजता भुसावळ तर. सकाळी ९.३०वाजता अजनी पोहचेल. गाडी क्र. ०१२५१ ही दि. ६ रोजी सायंकाळी ६.४० वाजता रवाना होवून पहाटे ४.१०वाजता भुसावळ तर सकाळी १०.३० वाजता सेवाग्राम पोहचेल.

गाडी क्र. ०१२५३ दि. ७ रोजी पहाटे १२.४० वाजता दादर येथून रवाना होवून सकाळी ८ वाजता भुसावळ तर दुपारी ३.५५ वाजता अजनी पोहचेल.गाडी क्र. ०१२५५ ही दि. ७ रोजी पहाटे १२.३५ वाजता मुंबई सीएसटीएमहुन रवाना होऊन रात्री ८.२५ वाजता भुसावळ तर पहाटे ३.३० वाजता नागपूर पोहचेल.

गाडी क्र. ०१२५७ ही दि. ८ रोजी सायंकाळी ६.४० वाजता रवाा होवून पहाटे ४.४० वाजता भुसावळ तर दुपारी १२.१० वाजता नागपुर पोहचेल.गाडी क्र. ०१२५९ दि. ८ रोजी पहाटे १२.४० वाजता दादरहून रवाना होवून सकाळी ८.१० वाजता भुसावळ तर दुपारी ३.५५ वाजता अजनी पोहचेल.

या गाड्यांना १० जनरल व २ एसएलआर असे १२ डबे असतील. या गाड्या विभागातील इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, मलकापुर, जळंब, अकोला, मुर्तीजापुर, बडनेरा स्थानकांवर थांबतील.

अनुयायांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे तसेच इतर प्रवाशांनी गाड्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*