मानवी भविष्य सुरक्षित ठेवणारी बीज बँक धोक्यात ?

0
लंडन | वृत्तसंस्था :  ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे जगावर अचानक एखादे मोठे संकट येऊ शकते, अशी भिती शास्त्रज्ञांना वाटत आहे.
ही भिती लक्षात घेऊन २००८ मध्ये शास्त्रज्ञांनी नॉर्वेमध्ये एक अनोखी बँक बनविली असून तिच्यामध्ये जगभरात आढळणारे सर्वोत्तम व उच्च गुणवत्तेचे धान्य, ङ्गळे, भाज्या आणि झाड-रोपट्यांचे निवडक बीज सांभाळून ठेवले आहे.

’ग्लोबल सीड वॉल्ट’ नावाची ही बँक स्थापन करण्यामागे एखाद्या दिवशी जगावर मोठे संकट आल्यास, त्याही परिस्थितीत भविष्यासाठी धान्य व खाद्यसामग्रीचा पुरवठा निश्‍चित केला जाऊ शकेल व या आपत्तीत सगळेच बर्बाद होऊ नये. हा हेतू आहे. या ग्लोबल सीड वॉल्टची कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत टिकून राहू शकेल, अशा खास पद्धतीने रचना करण्यात आली होती.

ही वॉल्टकडून महाप्रलयातही सहीसलामत राहील अशी अपेक्षा होती व आपत्तीतून सावरल्यानंतर तिच्या मदतीने भविष्यात मानव व अन्य जीवांचे पोट भरण्याची व्यवस्था केली जाईल.

मात्र ही बीज बँकही ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यातून सुटू शकली नाही. शास्त्रज्ञांच्या मते, कोणत्याही आपत्तीत हानी पोहोचणार नाही अशी रचना केलेली ही बीज बँक अभेद्य मानली जात होती.

संपूर्ण मानवतेचे भविष्य वाचविण्याच्या उद्देशाने तयार केलेली ही सीड वॉल्ट आक्रि्टकच्या बर्ङ्गाळ डोंगरात अतिशय खोलवर बनविलेली आहे. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे या भागातील तापमान बरेच उष्ण राहिलेने तिथल्या वातावरणात चित्रविचित्र बदल पाहण्यास मिळत आहेत.

त्यामुळे मोठया प्रमाणावर बर्ङ्ग वितळून या बीज बँकेत प्रवेश करणारा बोगदा पाण्याने भरला. सुदैवाने बोगद्यातील पाणी वॉल्टपर्यंत पोहोचले नाही व तिथली बीजे सुरक्षित राहिली. पण भविष्यात हा धोका कायम आहे.

LEAVE A REPLY

*