सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी उपोषण

0

जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-जि.प.सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आणि सफाई कामगारांचे रिक्तपदे सरळ सेवेने भरण्याच्या मागणीसाठी अंत्योदय कामगार परिषदेतर्फे जि.प.समोर आमरण उपोषण सुरु आहे. दरम्यान शिष्टमंडळाने जि.प.च्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापुरकर यांच्याशी चर्चा केली.

सफाई कामगारांचे रिक्तपदे भरण्यात यावे, पदोन्नती देण्यात यावी, वाहनचालकांना पदोन्नती देण्यात यावी, अनुकंप तत्वावरील पदे भरण्यात यावे आदी प्रलंबित मागण्यासाठी अंत्योदय कामगार परिषदेतर्फे जि.प.समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी प्रतिभा सुर्वे, मनोज खरारे, किशोर जावे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान उपोषणकर्त्या शिष्टमंडळाला आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*