भुसावळ शेतकी संघावर ‘सहकार’

0

भुसावळ । दि.27 । प्रतिनिधी-तालुका शेतकी संघाच्या चुरशीच्या झालेल्या पंचवर्षीक निवडणुकीत आ़ संजय सावकारे प्रणित सहकार पॅनलने 8 जागा मिळवत बहुमत सिध्द केले आहे़ तर प्रतिस्पर्धी माजी आ़ संतोष चौधरी यांच्या शेतकरी विकास पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले़ विजयी अमेदवारांमध्ये बहुतेक उमेदवार नवखे असून दोन्ही पॅनल प्रमुख आजी-माजी चेअरमन यात विजयी झाले आहे़

शेतकी संघासाठी द़ि 26 रोजी मतदान झाले. तर दि. 27 रोजी सकाळी 8वाजे पासून मतमोजणी तापीनगरातील हिंदू हौसिंग सोसायटीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सह़ संस्था) आर.आर. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली़ दुपारी अडीच वाजेपर्यंत निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात आले़

शेतकरी सह़ संघ निवडणूकीत विजयी उमेदवारांमध्ये अनुसुचित जाती, जमाती गटात 1 – सहकार पॅनलचे प्रशांत सुकदेव निकम (545 मते), भटक्या विमुक्त जाती / जमाती विशेष मागास प्रवर्ग जागेसाठी सहकार पॅनलचे बाळकृष्ण पोपट धनगर (547), इतर मागासवर्ग – 1 जागेसाठी, शेतकरी पॅनल प्रा़ गजानन गोपाळ सरोदे (512), महिला राखीव गटाच्या 2 जागांसाठी सहकार पॅनलच्या कमलबाई तुकाराम पाटील (521) व माधुरी संजय पाटील (496) या विजयी झाल्या़

व्यक्तीश: सभासद संघाच्या तीन जागांवर सहकार पॅनलचे अनिल रामचंद्र भोळे (385) व सुरेश नारायण येवले (446), तर शेतकरी पॅनलचे अशोक भास्कर सरोदे (310) झाले़ सोसायटी मतदार (संस्था सभासद) संघाच्या 7 जागांसाठी शेतकरी पॅनलचे हेमंत प्रतापराव देशमुख (30), विलास प्रल्हादराव देवरक (33), गोविंदा तुकाराम ढोले (30), पंढरीनाथ तुकाराम पाटील (31), विजयी झाले़

मतमोजणी केंद्राबाहेर सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात उमेदवार समर्थक व पॅनल प्रमुखांनी गर्दी केली होती़ मतमोजणी प्रक्रियासाठी विलंब होत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती़ दरम्यान दुपारी 12 वाजेनंतर पहीला निकाल जाहीर झाला़ यानंतर दुपारी 2230 वाजेपर्यंत निकाल निवडणूक निर्णय अधिकारी आऱआऱ पाटील, सहाय्यक निर्णय अधिकारी मनोज चौधरी, आऱपी़ निकाळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी काम पाहीले. शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला.

शेतकरी पॅनलच्य विजयी उमेदवारांचे शनिमंदीर वार्डातील आपल्या संपर्क कार्यालयात माजी आ. संतोष चौधरी, अ‍ॅड. रविंद्र पाटील, सचिन चौधरी, माजी पं.स.सभापती राजेंद्र चौधरी यांनी सत्कार केला.

दरम्यान, सहकार पॅनच्या विजयी उमेदवारांचा सत्कार आ. संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी विजयी उमेदवारांसह समाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, पं.स. सभापती सुनील महाजन, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योगपती मनोज बियाणी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, नारायण कोळी, संजय पाटील, नगरसेवक पिंटू ठाकूर, किरण कोलते यांच्या सह नगरसेवक व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उमेदवावारांचे समर्थक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*