रुख्मिणी फाऊंडेशन, मिडटाऊनतर्फे कारागृहात ब्लँकेट वाटप

0

जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-रुख्मिणी फाऊंडेशन, मिडटाऊनतर्फे कारागृहात कैदींना ब्लँकेट आणि महिला कैद्यांसोबत राहणार्‍या लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खेळणी वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संघपती दलुभाऊ जैन, कारागृह अधिक्षक सुनिल कुंवर, नरेश खंडेवाल, रमेश कांकरीया, पद्मकुमार कोठारी, रोहित निकम, धिरज सोनी, दिलीप लुनिया, मिना लुनिया उपस्थित होते. प्रारंभी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर कैद्यांना ब्लँकेट वाटप आणि महिला कैद्यांसोबत राहणार्‍या लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खेळणी वाटप करण्यात आले.

याप्रसंगी दलुभाऊ जैन यांनी कैद्यांसाठी पुस्तके भेट देणार असल्याचे सांगितले. रमेश कांकरीया यांनी दोन शिलाई मशिन देण्याचे जाहीर केले.

सुत्रसंचलन पंकज जैन यांनी केले. आभार अ‍ॅड.शैलेश नागला यांनी मानले. सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय, बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरातील उघड्यावर झोपणार्‍या गरजूंना देखील ब्लँकेट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला कमलेश डांबरे, शितल जैन, पियुष वर्मा, आशिष जैन, योगेश निंबाळकर, संतोष पाटील, पियुष जैन, नंदलाल दर्डा, राहुल चौधरी, अमित भावनानी, अन्वीत निकम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*