रामेश्वर कॉलनीतील बंद घरातून 35 हजारांची चोरी

0

जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-शहरातील रामेश्वर कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना काल दि. 24 रोजी उघडकीस आली. दरम्यान कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीत उपेंद्र गंभीर चव्हाण हे वास्तव्यास असून चव्हाण हे दि. 22 रोजी आपल्या कुटुंबासह सुरत येथे गेले होते.

दरम्यान त्याच रात्री चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन लाकडी कपाटात ठेवलेले 35 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

ही घटना दि. 24 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उपेंद्र चव्हाण यांच्या शेजारी राहणारे भाजपाचे महानगर सरचिटणीस अनिल सोनवणे यांच्या लक्षात आली.

यावेळी सोनवणे यांनी तात्काळ चव्हाण यांना माहिती दिली. त्यानुसार उपेंद्र चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

तसेच चोरट्यांनी चव्हाण यांच्या घरातील रोकड लंपास केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचे तोडलेले कुलूप सुद्धा सोबत घेवून गेले आहे.

LEAVE A REPLY

*