महाबळ वार्ड ‘कचराकुंडीमुक्त’ पॅटर्न

0

जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून साथीच्या आजाराचा फैलाव होत आहे. कचराकुंडीतील कचरा उचलला जात नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

त्यामुळे वार्ड क्र.36 कचरा व कचराकुंडीमुक्त करण्याची संकल्पना नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी राबविली आहे. दरम्यान सकाळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी भेट देवून पाहणी केली.

वार्ड क्र.36 मधील नगरसेविका अश्विनी देशमुख गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या माध्यमाद्वारे कचराकुंडीमुक्त वार्ड बाबत जनजागृती करीत आहेत.

त्यासाठी प्रत्यक्ष भेटी आणि फलक व पत्रकांद्वारे जनजागृती करुन ‘घंटागाडीतच कचरा टाकू या’ अशी संकल्पना राबविली.

त्यामुळे वार्डात 90 टक्के कचरा व कचराकुंडीमुक्त झाल्याचा दावा नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी केला. जिल्हाधिकार्‍यांसह पाहणी करुन उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

*