जळगावात नऊ रोजी व्याघ्र परिषद

0

जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेच्या पुढाकाराने न्यू कॉन्झरवर, वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव, विवेकानंद प्रतिष्ठान, रोटरी क्लब, अग्निपंख, उपज, जैन उद्योग समूह, जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 डिसेंबर रोजी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात वसूंधरा महोत्सवातंर्गत व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सातपूड्यातील वाघांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.

व्याघ्र परिषदेत महाराष्ट्रातून वन्यजीव प्रेमी, व्याघ्र संवर्धन क्षेत्रातील तज्ञ ,संशोधक, वन अधिकारी सहभागी होतील. या माध्यमातून प.सातपुडा विशेषतः जळगांव जिल्यातील यावल अभयारण्य आणि वढोदा वन क्षेत्रातील वाघांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधले जाईल त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सतत होत असलेले वाघांचे सर्वाधिक मृत्यू, वाघांचा अधिवास, वाघांची शास्त्रीय माहिती, मानव वन्यजीव संघर्ष, अश्या विविध प्रकारच्या मुद्यांवर सखोल चर्चा आणि उहापोह या व्याघ्र परिषदेत होणार आहे.

यावल, चारठाना, डोलारखेडा, इ. क्षेत्रातील वनव्यवस्थापन समित्या , वनाधिकारी, यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. परिषदेचे बीज भाषण राष्ट्रीय वन्य जीव मंडळाचे माजी सदस्य आणि वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे करणार आहेत.

मुख्य वन संरक्षक एस व्ही रामाराव रिटर्न ऑफ टायगर इन यावल सेंच्युरी, बंडू धोतरे कॉरिडॉर आणि पॅसेजची आवश्यकता, तुषार शिंदे टेक्नॉलॉजी फॉर टायगर काँझर्वेशन तर अभय उजागरे जळगाव जिल्ह्यातील वाघांचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

केळीच्या शेतातील वाघ यावर वनसंरक्षक आदर्श रेड्डी, लक्ष्मीनारायण सोनवणे थ्रेट टू द टायगर ऑफ जळगाव डिस्ट्रिक्ट, राजल पाठक व्याघ्र संवर्धनाचे महत्व, राजेंद्र नन्नावरे स्वयंसेवी संस्था आणि स्थनिक समुदायाची भूमिका या विषयांवर मागदर्शन करणार आहेत.

मुख्य वनसंरक्षक धुळे राजेंद्र कदम, व्याघ्र अभ्यासक राहुल शुक्ला, डॉ संजय गायकवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अभ्यासक विविध अभ्यासपूर्ण विषयावर सादरीकरण करणार आहेत, अधिकाधिक वन्यजीव प्रेमीनी या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन वसुंधरा संयोजन समितीच्या वतीने राजेंद्र नंनवरे, अभय उजागरे, रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, अमन गुजर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*