पाया पक्का तर स्पर्धा परीक्षेत हमखास यश : प्रा.लेकुरवाळे

0
धरणगाव, | प्रतिनिधी :  जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रश्नकर्त्या जमतीचा सदस्य न होता उत्तर शोधणार्‍या जमातीतील सदस्य व्हावे. उत्तुंग यश मिळवणं कठीण असलं तरी अशक्य मात्र नाही. त्यासाठी ध्येय निश्चित करायला हवं.

वेळेचं नियोजन करुन कठोर परीश्रम करायला हवेत. अभ्यासात ज्यांचा पाया पक्का असेल त्यांना स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळतं असे प्रतिपादन प्रा.जयेंद्र लेकूरवाळे यांनी केले.

भाजप आयोजित गुणवंत सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विक्रम वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.आर.एन.महाजन होते.

स्पर्धा परीक्षेत येणार्‍या अडचणी, त्यासाठी लागणारी तयारी, यशस्वी व्य्क्तींचे दाखले देत लेकुरवाळे यांनी मार्गदर्शन केले. अनेक प्रेरणादाई कथा सांगितल्या. ते म्हणाले, महागडे क्लास, मोठमोठी, महागडी पुस्तकं याने यश मिळत नाही. सातत्य आणि परीश्रमाने गावातही यश मिळवता येते हे या मुलांनी सिध्द केलय असे ते म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेले पंकज सपकाळे यांची पी.एस.आय.पदी तर दिपक कुंभार यांची विक्रीकर अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्याचबरोबर व्यसन मुक्ती निर्मूलनाचे उत्तम कार्यकरीत असरणारे हेमंत महाजन यांच्याही भाजपतर्ङ्गे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशस्वी गुणवंत हे शहराचे आयकॉन असून त्यांच्या यशाची प्रेरणा सर्व धरणगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळावी, असे प्रा.लेकुरवाळे म्हणाले. याच उद्देशाने या यशस्वितांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, प्रा.आर.एन.महाजन, सुभाष पाटील, यांचा सत्कार भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन, सुनील वाणी, भालचंद्र महाजन, नपा.विरोधी पक्ष गट नेते कैलास माळी यांनी केला.

ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षा पुस्तकांना देणगीदार म्हणुन लाभलेले मधुकर रोकड़े, शरद माळी व पंकज सपकाळे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देणगी दिली.

सत्कार समारंभासाठी व विशेष व्यख्यानाकरीता कार्यक्रमाला गावातील नागरिक, मान्यवर,नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि विशेष म्हणजे तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर सचिन पाटिल यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वितेसाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतली.

LEAVE A REPLY

*