स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा उजाळा

0

जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या जळगाव जिल्हा केंद्रातर्फे स्व.यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याला उजाळा देवून अभिवादन करण्यात आले.

नूतन मराठा महाविद्यालयाच्या डॉ. बोस सभागृहात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमीत्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील होते. प्रमुख पाहुणे अ‍ॅड. रवींद्र पाटील, गफ्फार मलिक, निशा जैन, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.किसन पाटील, प्रा.भास्कर पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रा.डॉ.किसन पाटील यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले गोदाकाठ हे खर्‍या अर्थाने कसदार आणि प्रेरणादायी साहित्य आहे.

यशंतराव चव्हाण हे राजकारणात असूनही ते एक चांगले साहित्यिक होते, असे सांगीतले. प्रा. भास्कर पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय जीवनप्रवास उलगडला.

यावेळी चव्हाण प्रतिष्ठानच्या जळगाव केंद्रांचे पदाधिकारी प्रा. एन. डी. पाटील, ज्ञानेश मोरे, अशोक सोनवणे, शंभू पाटील, सुनील पाटील, डॉ. बाबू शेख उपस्थित होते. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एन. डी. पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*