वीज बिलांच्या विरोधात रावेरला शिवसेनेचा मोर्चा

0
रावेर |  प्रतिनिधी :  येथे  कृषी संजीवनी योजना त्वरीत बंद करुन शेतकरी बांधवांना संपुर्ण विज बील माङ्ग करावे या सह वीजे संदर्भातील विविध समस्या व मागण्यांसाठी रावेर तालुका शिवसेना आणि युवासेना यांनी काढलेल्या भव्य धडक मोर्चा मधील विविध घोषणांनी परिसर दणाणला.

वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण दौरे आयोजित करून योग्य बिल देण्याचे आश्वासन दिले.

येथील छोरीया मार्केट येथुन या भव्य मोर्चास सुरवात झाली. शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकारी अविनाश पाटील, तालुका युवाधिकारी प्रवीण पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, युवासेने तर्ङ्गे निघालेल्या हा भव्य धडक मोर्चा येथील विज वितरण कं. च्या कार्यालयावर धडकला.

रस्त्याने कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, जय भवानी, जय शिवाराय, मउध्दवजी ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैफ, शेतकरी बांधवांना संपुर्ण विजबील माङ्गी मिळालीच पाहिजेफ या विवीध घोषणंनी शहर व परिसर दुमदुमुन गेला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चेकरी वीज वितरण कंपनीच्या रावेर कार्यालयावर पोहचले आणि मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

या वेळी विज वितरण कं. सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. मोरे, उप अभियंता गणेश असमर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात शेतकर्‍यांचे संपूर्ण वीजबिल माङ्ग करावे, शेतकर्‍यांना २४ तासाच्या आत जळालेले ट्रान्स ङ्गार्मर बदलून मिळावे, १२ तास वीजपुरवठा देण्यात यावा, शेतकर्‍यांचे वीजबिल हॉर्सपॉवर पद्धतीने देण्यात यावे, घरगुती वीज बिल अंदाजे न देता योग्य पध्दतीने देण्यात यावे, शेतकर्‍यांना शेतातील ३ ङ्गेज चा वीजपुरवठा पूर्ण ४१० होल्टने देण्यात यावा, आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शासनाची ङ्गसवी कृषी संजीवनी योजना त्वरीत बंद करून शेतकर्‍यांना संपूर्ण वीजबिल माङ्ग करण्यात यावे, आदि मगण्यांचा समावेष आहे.

या वेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका प्रमुख योगीराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मोर्चात मुक्ताईनगर विधान सभा क्षेत्र प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना शहर प्रमुख नितीन (बंन्टी) महाजन, युवासेना शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, लक्ष्मण मनुरे, माजी नगर सेवक सुधाकर महाजन, माजी पं.स. सदस्य रविंद्र महाजन, अशोक शिंदे, रविंद्र पवार, जि.प. माजी अध्यक्ष उखर्डु तडवी, अमरदिप पाटील, सुरजसिंह परदेशी, वाय. व्ही. पाटील, ऍड.जे.जी.पाटील, अशोक पाटील, डॉ.आदिल अझहर शेख, दिलीप पाटील, गोपाल मिस्तरी, जेष्ठ शिवसैनिक तुकाराम कोळी, अरुणमामा महाजन, विनायक पाटील, सुरेश पाटील, केर्‍हाळे ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील, सुरेश शिंदे, संतोष महाजन, कन्हैया गणवानी, हर्षल बेलस्कर, प्रभाकर चौधरी, सुभाष महाजन, भाऊलाल पहेलवान, शे.जावेद, तौसीङ्ग शे., शे.गुलाम, मो.आसिङ्ग, छोटु पाटील, कल्याण पाटील, भुरा पाटील, तरुण गाढे, रमेश पवार, रामसिंग पवार, बबलु चौधरी, शहर उपप्रमुख संतोष महाजन, कृणाल बागरे, ललीत महाजन, दादु पाटील, जिवन पाटील, राजु लोहार, ठाणसिंग पाटील, मुकेश पाटील, गोपाळ लढे, यांच्या सह तालुका शिवसेना, युवासेना पदाधिकरी व हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक व शेतकरी बांधव मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी नायब तहसीलदार श्री. भावसार, सपोनि गजेंद्र पाटील, पो.उ.नि. दीपक ढोमणे, प्रवीण निखाळजे यांच्यासह पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

*