भुजबळांच्या जामिनावर पुढील सुनावणीत निर्णय

0

मुंबई । दि.24 । वृत्तसंस्था-गेल्या दीड वर्षांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ‘पीएमएलए’ अर्थात ‘मनी लॉन्ड्रिंग’विरोधी कायद्यातील कलम 45 रद्द झाल्याने त्याचा फायदा भुजबळांना मिळू शकतो.

भुजबळांनाही याच कलम 45 मुळे गेल्या दीड वर्षांपासून जामीन मिळू शकलेला नाही. या कलमाखाली सरकारला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात एखाद्या आरोपीला गुन्हा सिद्ध होण्याआधी अमर्याद काळ तुरुंगात ठेवणे, त्याला जामीन नाकारण्याचा पूर्ण अधिकार होता.

त्यामुळे आरोपीला जामीन मिळणे कठीण असते. मात्र सुप्रीम कोर्टाने एका खटल्यावरील सुनावणीदरम्यान ‘मनी लॉन्ड्रिंग’विरोधी कायद्यातले हे कलम 45 घटनाबाह्य ठरवले आहे. त्यामुळे भुजबळांचा जामिनाचा मार्ग सोपा झाला आहे.

LEAVE A REPLY

*