जिल्हा रुग्णालयात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

0

जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-जिल्हा सामन्य रुग्णालयाच्या परिसरातील साडेपाच एकर जागेवर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी शासकीय निवासस्थान आहेत. परंतु निवृत्त झाल्यानंतरही कर्मचारी रहिवास करीत होते.

तर काही कर्मचार्‍यांनी अनाधिकृत बांधकाम करुन भाड्याने देखील राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधिता 80 निवृत्त कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही घरे खाली करण्यात आली. आता जीर्ण अवस्थेत असलेली सर्व घ़रे पाडून साडेपाच एकरच्या जागेवर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल किंवा स्वतंत्र 100 खाटांचे महिला रुग्णालय उभारण्यात येर आहे.

त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती देखील डॉ.चव्हाण यांनी दिली. तसेच जिल्हा रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ट्रान्सफॉर्मरला मंजुरी दिली असून यापुढे विजेचा प्रश्न उद्भवणार नसल्याचेही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*