गणपती नगरातील दरोडाप्रकरणी दोघांचे रेखाचित्र जारी

0

जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरातील पाटील कुटुंबिय घरात झोपलेले असतांना मागील खोलीचा दरवाजाचा कडी कोंयडा तोडून दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवून दिड लाखाचा ऐवज लांबवून नेल्याची घटना काल दि.23 रोजी सकाळी उघडकीस आली होती.

याघटनेप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरु असून महिलेने दिलेल्या माहितीवरून दोघांचे रेखाचित्र (स्केच) जारी केले आहे. दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु होती.

गणपती नगरातील सुरेश पाटील यांचा घराचा मागील दरवाजाचे कडी कोयंडा तोडून पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील दिड लाखाचा ऐवज लांबवून नेला होता.

त्याच रात्री चोरटयांनी सिध्दार्थ नगरातील घराचा मागील दरवाज्यातून घरात प्रवेश करून 13 हजारांचा मुद्देमाल लांबवून नेल्याची घटना त्याच रात्री घडली होती.

या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. दरम्यान याप्रकरणी दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, रामानंद नगर पोलिसांचे पथक रवाना झाले असून महिलेने दिलेल्या माहितीवरून दोन संशयितांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.

दोघांची महिलेसमक्ष ओळखपरेड
पोलिसांना गेंदालाल मिल परिसरातून अनिस पठाण व संदिप डोके या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या दोघांची सुरेश पाटील यांच्या पत्नी प्रिती पाटील यांच्यासमक्ष घरी नेवून ओळखपरेड करण्यात आली. यावेळी महिलेने पाचपैकी दोन दरोडेखोर यांच्या सारखेच दिसत असल्याचा अंदाज व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*