पांडे चौकातील युवकाची गळफास घेवून आत्महत्त्या

0

जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-शहरातील पांडे चौकातील रहिवाशी असलेल्या 39 वर्षीय युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, पांडे चौकातील अवधुत सायकल मार्टजवळील गल्लीतील रहिवाशी व सिव्हील हॉस्पीटलच्या बाहेरील नारळ विक्रेते दिपक (प्रकाश) शशिकांत साबळे वय 39 यांनी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

त्यांचा लहान मुलगा उदय याला हा प्रकार दिसला. त्याने पळत जावून खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करीत असलेल्या आईला याबाबात सांगितले.

दिपक साबळे यांची पत्नी रत्नमाला साबळे यांनी घरी येवून पाहिले असता, पतीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. हे पाहताच त्यांनी आक्रोश केला.

त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या दिपक याचा मृतदेह खाली उतरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी त्याला मयत घोषित केले.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दिपक यांच्या पश्चात पत्नी दिपमाला, दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे.

दिवसभर सिव्हील हॉस्पिटल बाहेर नारळ विकून गोरगरीबांना मदत करणार्‍या दिपकच्या मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.

मयत दिपक याने नेहमी प्रमाणे सकाळी नारळ पाणी विक्रीचे दुकान लावले. मुलगा जवळ असलेल्या शाळेतून घरी आल्यानंतर दिपक याने त्याला भजी आणून दिले.

पत्नी त्याच्या सिव्हील हॉस्पिटल समोरील एका खाजगी रुग्णालयात कामावर गेली होती. लहान मुलगा व दिपक घरी असतांना मुलाने भजी खाल्यानंतर मुलगा खेळण्यासाठी निघून गेला. यावेळेत दिपक राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

*