भिलपुरा चौकात तणाव

0

जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-महानगरपालिकेने अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई सोमवारपासून सुरु केली आहे. भिलपुरा चौक परिसरात गटारीवर ढापे बांधून त्यावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र अतिक्रमण धारकांकडून कारवाईला विरोध झाल्यामुळे शाब्दीक वाद झाला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

महानगरपालिकेने गेल्या चार दिवसांपासून नो हॉकर्स झोनमधील हॉकर्सधारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरु केली आहे. नो हॉकर्सझोनमध्ये टपर्‍या किंवा हातगाड्या आढळल्यास त्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात येत आहे.

या कारवाईच्या अनुषंगाने शनिपेठ परिसरात गटारींवर ढापे टाकून त्यावर टपर्‍या टाकून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार महानगरपालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी गेले होते.

कारवाई सुरु असतांना गर्दी होवून गोंधळ निर्माण झाला. तसेच अतिक्रमण धारक आणि महापालिकेचे पथक यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

कारवाई दरम्यान जमाव
शनिपेठ पोलीसांत अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई सुरु असतांना नागरिक आणि व्यापार्‍यांची गर्दी झाली होती. कारवाईला विरोध झाल्यामुळे शाब्दीक वाद झाला.

त्यामुळे तणाव निर्माण झाला. दरम्यान माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी घटनास्थळी धाव घेवून जमावाची समजूत काढली.

यावेळी अतिक्रमण धारकांनी स्वत:च ढापे तोडून गटार मोकळी करुन देण्याचे मान्य केले. अतिक्रमण धारकांनी स्वत: ढापे न तोडल्यास जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण तोडण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला.

गटारींवरील अतिक्रमीत बांधकाम तोडले
भिलपुरा परिसरात गटारींवर ढापे टाकून गटार बंद केल्याचा प्रकार उघडकीस आला. पाच ते आठ फुटापर्यंत ढापे टाकून त्यावर टपरी आणि काही दुकानांचे अतिक्रमण आहे. दरम्यान, अतिक्रमण निर्मुलन पथकाने गटारीवरील बांधकाम तोडण्याची कारवाई केली.

हॉकर्सचे उपोषण सुरुच
महानगरपालिकेने सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात हॉकर्सधारकांनी महापालिकेसमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. तीन दिवसापासून हॉकर्सधारकांना अनेक संघटकांनी पाठिंबा दिला आहे. आज दुपारी समाजवादी पार्टीतर्फे रागीब अहमद, अशफाक पिंजारी, रईस बागवान, अलताफ शेख तसेच भारतीय कामगार संघटनेचे जहाँगीर खान यांनी उपोषणस्थळी भेट देवून पाठींबा जाहीर केला.

 

LEAVE A REPLY

*