जामनेर तालुक्याच्या विकासासाठी २० कोटी मंजूर – ना.गिरीश महाजन

0
जामनेर | प्रतिनिधी :   येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरवासीयांना अद्यावत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाने २० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

नव्याने मंजुर झालेल्या या निधीतून शहरातील जळगाव रोड व गणेशवाडी नजीक प्रत्येकी १ कोटी रूपये खर्चाची भव्य सामाजिक सभागृहे बांधण्यात येणार असून सोनबर्डीवर रिक्रीऐशन सेंटर अंतर्गत जॉगींग ट्रॅक व बगीच्यासाठी २.५ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे.

आजमितीला शहरात जवळपास २०० कोटी रूपये खर्चाची कामे प्रगतीपथावर असून जामनेर शहर हे लवकरच राज्यातील आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल. असा पुनरूच्चारही ना.महाजन यांनी यावेळी बोलतांना केला.

राज्याच्या नगरविकास विभागाकडून गेल्या दि.१६ रोजी वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत १० कोटी रूपये आणि विशेष रस्ता अनुदान म्हणून १० कोटी रूपये असे एकूण २० कोटी रूपये जामनेर नगरपरिषदेला मंजुर करण्यात आले आहे.या निधीतून मंजुर झालेली कामे येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष सुरू होणार असून या काळात सध्या प्रस्तावित असलेले अल्पसंख्याक विकास योजना अंतर्गत १ कोटी रूपयांच्या कामांनाही मंजुरी मिळेल. अशी खात्रीही ना.महाजन यांनी व्यक्त केली.

वैशिष्ठ्यपुर्ण योजनेअंतर्गत १० कोटी रूपये खर्च करून शहरातील विविध भागात करण्यात येणार असलेली कामे पुढील प्रमाणे- दामले प्लॉट नं.२४९ मधील खुल्याजागेत सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७५ लाख), चांगदेव नगर गट नं.३८७/१ मधील खुला भुखंड बगीचा विकसीत करणे (२४.३५ लाख), गट नं.३४७ खुल्या जागेत क्रीडांगण विकसीत करणे (४० लाख), पाटील वाडी गट नं.३८१ खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (३४.७५ लाख), आचार्य तुलसीनगर गट नं.२३९ /२ ब/५ खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (३४.७५ लाख),श्रीराम नगर गट नं.२३३ मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (३०.८० लाख), आय टी आय कॉलनी गट नं.४३१/ २ मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (२८.१५ लाख), शास्त्रीनगर मधील खुल्याजागेत बगीचा विकसीत करणे (३१.८० लाख), शिवकॉलनी गट नं.४४१ मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (४८.१० लाख), द्वारकादर्शन कॉलनी गट नं.४३९ खुल्याजागेत बगीचा विकसीत करणे (४१.४० लाख), राजस्व नगर गट नं.४०९ पैकी मधील खुल्या जागेत क्रीडांगण विकसीत करणे (४१.४० लाख), गट नं.४४३/१ सुपारी बाग मधील खुल्या जागेत क्रीडांगण विकसीत करणे (४७.५०), सानेगुरूजी कॉलनी गट नं.४८५/२ मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (४०.५० लाख),शिवशक्ती नगर गट नं.४०८ मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (३०.६५ लाख), गट नं.२४२ पैकी खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (४०.५० लाख), गट नं.५४९/४ कस्तुरी नगर मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (३३.५५ लाख), गट नं.५५० कस्तुरी नगर मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे (२८.०० लाख), गट नं.४०५ पुरूषोत्तम नगर मधील खुल्या जागेत क्रीडांगण विकसीत करणे (३०.७० लाख),शिवाजी नगर मधील बगीचा विकसीत करणे ( २५ लाख), भिल समाजासाठी स्मशानभुमी विकसीत करणे (२० लाख), नगरपरिषद नियोजीत प्रशासकीय ईमारतीसाठी ईलेक्ट्रीङ्गिकेशन चे काम करणे (१७५ लाख), गट नं.४७७ पैकी मधील जागेत दुकान संकुल बांधकाम करणे ( ५० लाख), जामनेरपुरा येथे व्यायाम शाळा बांधकाम करणे (२५ लाख), मदनीनगर जामनेर येथे व्यायाम शाळा बांधकाम करणे (२५ लाख), गट नं.४२१ मधील खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधकाम करणे ( १०० लाख),गट नं.२४० मधील मधील खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधकाम करणे ( १०० लाख), सोनबर्डी टेकडी गट नं.३९६ मधील रिक्रीऐशन सेंटर अंतर्गत जॉगीग ट्रॅक व बगीचा इ.( २५० लाख), गट नं.२९२ डोंगरे महाराज नगर मधील नियोजित जागी ईलेक्ट्रीक काम करणे ( ५ लाख)

रस्ता अनुदानातुन करण्यात येणारी कामे पुढील प्रमाणे- सोनबर्डी टेकडी गट नं.३९६ अंतर्गत रस्ता बांधकाम करणे (१०० लाख), गट नं.३६५ साईनाथ नगर अंतर्गत रस्ते खडीकरण करणे (१० लाख), लक्ष्मी कॉलनी गट नं.३९१/१ व ३९१/२ मधील रस्ते डांबरी करण करणे (२५ लाख) इंदिरा आवास गट नं.७१३ मधील रस्ते व आरसीसी गटार बांधकाम करणे (८० लाख), जामनेरपुरा गट नं.५६५ पैकी मधील रस्ते खडीकरण करणे (१५ लाख), जामनेरपुरा अहिल्याबाई होळकर नगर करीता रस्ते व गटार बांधकाम करणे (४० लाख), सहकारी औद्योगीक वसाहत जामनेर मधील रस्ते खडीकरण करणे (३० लाख), सानेगुरूजी कॉलनी सुयोग कॉलनी गट नं.४८५ रस्ते डांबरी करणासह गटार बांधकाम करणे ( ७० लाख), गिताई नगर गट नं.४८६ अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे ( ५० लाख), जामनेरपुरा माधव नगर येथील रस्ते डांबरीकरण करणे ( ३० लाख), गट नं.३६७ व ३६८ रस्ते खडीकरण करणे (२० लाख), गट नं.३७६ व ३७७ मधील रस्ते डांबरीकरण करणे (३० लाख), अशी कामे करण्यात येणार आहेत.

गेल्या २० वर्षात आलेल्या एकुण निधीपेक्षा तीन- चार पट निधी गेल्या दोन तीन वर्षात जामनेर शहरासाठी आलेला असून शहरवासीयांना दररोज शुध्द पाणीपुरवठा करणे आता शक्य होणार असल्याचेही ना.गिरीष महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

*