युवा महोत्सवातील लोकनृत्यात ‘क्रीडा भारती’ प्रथम

0
जळगाव |  प्रतिनिधी :  क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लोकनृत्यात क्रिडा भारती संस्थेला प्रथम पोरितोषीक देवून गौरव त्यांचा गौरव करण्यात आला.

क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, ऍड. महिमा मिश्रा, डॉ. अपर्णा भट, संजय पवार, विशाखा देशमुख, चित्रानंद खर्चे, रमेश भोळे, जगदिश नेवे, तेजस मराठे, महेंद्र सुर्यवंशी, रविंद्र भोईटे उपस्थित होते. त्यानंतर महोत्सवात सहभागी झालेल्या लोकनृत्य, एकांकिका, लोकगीत, शास्त्रीय गायन, कथ्थक नृत्य, तबला वादन, बासरी वादन, हार्मोनियम वादन, गिटार वादन,, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेत लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रिडा भारती तर द्वितीय एम. जे. महाविद्याल, लोकगीत स्पर्धेत- एन. स्पेअर म्युझिकल, एकांकि स्पर्धेत- जितेंद्र ठाकरे प्रतिष्ठान, हार्मोनियम वादन- निर्मल पाण्डेय, तबला वादन- मनिष गुरव, कुशराजे पवार, रोहित बोरसे, बासरी वादन- किर्तेश बाविस्कर, अजय सोनवणे, दर्शन वसईकर, शास्त्रीय गायन-दिक्षांत वानखेडे, मयुरी हरीमकर, कथ्थक नृत्य-ऐश्वर्या परशुरामे, मृणाल सोनवणे, संकेत वारुळकर, वकृत्व स्पर्धेत-विवेक म्हस्के, सागर धनगर हे विद्यार्थी विजेते ठरले.

दरम्यान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व स्पर्धेचा निकाल मोहन तायडे यांनी जाहिर केला. यशस्वीतेसाठी विनोद माने, राजश्री पाटील, जयश्री कोष्टी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*