दूध फेडरेशनजवळील स्वयंचलित रेल्वेगेट बसवर आदळले

0
जळगाव || प्रतिनिधी :  शहरातील दुध फेडरेशनजवळील सुरत रेल्वे लाईनवरील कॉसिंग गेटजवळून बस जात असतांना नवीन स्वयंचलित गेट अचानक बसवर आदळल्याची घटना सकाळी घडली. या प्रकारामुळे जवळपास अर्धातासपेक्षा अधिक वेळ वाहतुक ठप्प झाली होती.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातून जाणार्‍या रेल्वे लाईनवरुन रस्ता पार करण्यासाठी दुध फेडरेशनसमोर रेल्वे गेट आहे. या रेल्वे गेटला नुकतीच स्वयंचलित सिस्टीम लावण्यात आली आहे.

मात्र आज सकाळी अचानक या रेल्वेगेट फाटकामधून बस एमएच २० बीएल १६४१ ही शिवाजीनगरकडून पिंप्राळाकडे जात असतांना हे स्वयंचलित गेट बंद झाले व गेट अचानक बसवर आदळले. व हे स्वयंचलित गेट तुटून खाली पडल्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

त्यानंतर बस बाजुला घेण्यात येवून वाहतुक सुरळीत करण्यात आली. यावेळी रेल्वेचे अधिकारी यांनी याठिकाणी जावून माहिती घेतली. याप्रकारामुळे जवळपास अर्धातास वाहतुक विस्कळीत झाली होती. योगायोगाने यावेळी याठिकाणावरून एकही रेल्वे आली अथवा गेली नाही.

LEAVE A REPLY

*