भुसावळ मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीसह जंगम मालमत्तेच्या जप्तीचे न्यायालयाचे आदेश

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  येथील नगरपालिकेच्या ट्रॅक्टर खाली सापडून रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्या होता. या प्रकरणी परिवाराला आर्थिक मदत देण्याचे आदेश जळगाव न्यायालयाने दिले होते.
यानंतरही परिवाराल मदतीची रक्कम न मिळाल्याने मुख्याधिकारी यांची खुर्ची, वाहनासह १७ लाख ९३ हजार रुपयांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश न्यायालायने दिले आहे.जप्तीसाठी बेलीफ व वकील पालिकेत दि.२३ रोजी दुपारी दाखल झाले होते.मात्र कारवाई साठी पालिकेचे वेळ मागितल्याने तुर्त जप्ती टळली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे कर्मचारी रमकांत आनंदा महाले (रा. आनंद नगर, भुसावळ) यांच्या मोटरसायकला दि. १६ एप्रिल २००९ मध्ये पालिकेच्या ट्रॅक्टरने धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत महाले यांचे वारस विद्या रमाकांत महाले,विद्या रमाकांत महाले,सूर्यकांत रमाकांत महाले यांनी जळगावच्या मोटर अपघात न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

त्यावर मार्च २०१६ मध्ये सुनावणी होवून न्या. ए.के. पटणी यांनी अर्ज मंजुर करुन १४ लाख ८० हजार रुपये आणि रक्कमेवरील व्याज पालिकेने ९० दिवसात वारसांना देण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने वारसानना रक्कम अदा केलेली नाही. मदतीची रक्कम वसुलीसाठी वारसांनी दरखास्त ४०/२०१६ दाखल केले होते. दरम्यान, या आदेशाला पालिकेचे उच्च न्यायालयात अपिल केले आहे.

त्या अपीलाला न्यायालयाने स्थगिती दिल्याचे वारसांचे वकिल ऍड. रतीलाल पाटील यांनी सांगितले. दरखास्त बाबात न्यायालयाने नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची खुर्ची व वाहन ५लाख ३हजार रुपये, फर्निचर ७लाख, कार्यालयातील ५० टेबल खुर्ची ७५ हजार रुपये, ५० पंखे ५० हजार रुपये, ३०कॉम्प्युटर ४लाख ५० हजार, ३० कपाट १५ हजार असा एकुण १७लाख ९३ हजार रुपयांची जंगम मामलमत्ता जप्तीचे आदेश दिले आहे.

या जप्तीसाठी दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ऍड. रतीलाल एकनाथ पाटील, भुसावळ न्यायालयाचे बेलिफ हेमंत सावंत व जी.पी. सोनवणे पालिकेत दाखल झाले होते.

मात्र संपूर्ण एकत्रीत रक्कम २२ लाख ९ हजार १७१ रुपये ही मोठी रक्कम असल्याने या रक्कमेबाबत तरदुत करण्यासाठी पालिकेने लेखी स्वरुपात काही वेळ मागितल्याने त्यांना वेळेची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी दि. १२ डीसेंबर रोजी होणार आसल्याचे ऍड. पाटील यांनी सांगितले.

ठेकेदारच्या ट्रॅक्टर चालकाकडून झालेल्या अपघातातील मयताच्या वारसांनी आर्थिक मदतीसाठी २२ लाखांचा अपिल केला आहे.त्याबाबत न्यायालयाचा जप्ती वारंट आला आहे. याबाबत आपल्या वकिलांशी बोलून निर्णय घेवू. या प्रकरणी पालिकेने पूर्वीच उच्च न्यायालयात अपील दाखल केला आहे. त्याची सुनावणी सुरु आहे. सुनावणी नुसार निर्णय घेवू. याबाबतचा अपील उच्च न्यायालयाने फेटाळलेला किंवा स्थगिती दिलेली नाही.
-बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी

LEAVE A REPLY

*