भारत निर्माण योजनांच्या 40 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याचेे आदेश

0

जळगाव । दि. 22 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांमार्फेत राबविण्यात येणार्‍या भारत निर्माण योजनेच्या 40 प्रकरणांमध्ये अपहार आढळून आला.

त्यामुळे या 40 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.

जिल्हयातील भारत निर्माणच्या 280 पाणी पुरवठा योजनांचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या योजनांच्या चौकश्या सुरु असून यातील काही ग्रामपंचायतीमधील योजनांमध्ये मोठया प्रमाणात अपहार आढळून आला आहे.

शासनाकडून भारत निर्माणच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मोठया प्रमाणात निधी देण्यात आला असून यात अपहार झाल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात प्राप्त झाल्या आहे.

जिल्हयातील 40 ग्रामपंचायतींनी या योजनांचे रेकार्ड न ठेवणे, विना परवानगी योजनेचे परस्पर पैसे काढणे यासह अनेक अपहार चौकशीत आढळून आले.

त्यानुसार आज सीईओ यांनी या योजनेप्रकरणी 40 ग्रामपंचायतींच्या योजनांमध्ये अपहार आढळून आला. यात पाचोरा तालुक्यातील 4, चाळीसगाव -3,अमळनेर -6, पारोळा -1, चोपडा-1, मुक्ताईनगर -6, भुसावळ -4,बोदवड-5 , रावेर -7 अशा 40 ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठया प्रमाणात अपहार झाला.

या पाणी पुरवठा योजनेत झाला अपहार
खडकदेवळा पा.पु योजना, चिंचाळे (पिंपळगाव खु) पा.पु.योजना. सारोळा खु. पा.पु योजना, खाजोळा पा.पु. योजना, उंबरखेडा पा.पु योजना, लोंढे पा.पु. योजना, खराडी पा.पु. योजना, रुंधांटी पा.पु योजना, कंडारी पा.पु. योजना. लोणे पा.पु.योजना, हेडावे पा.पु.योजना, बिलखेडा हिंगोणे पा.पु, तलवाडे पाणीपुरवठा योजना, टेहू पा.पु. योजना, मेहु पा.पु. योजना, जिराळी पा.पु. योजना, मालखेडा पा.पु. योजना, चिंचोल पा.पु. योजना, बोदवड पा.पु. योजना, चिंचखेडा पा.पु. योजना, उमरे पा.पु. योजना, तालखेडा पा.पु. योजना, बेलव्हाय पा.पु. योजना, वराडसिम पा.पु. योजना, निंभोरा बु। पा.पु. योजना, आचेगाव पा.पु. योजना, मनुर बु। पा.पु. योजना, राजूर पा.पु. योजना, करंजी व पाचदेवी पा.पु. योजना, सुरवाडे बु। पा.पु. योजना, सुरवाडे खु। पा.पु. योजना, बक्षिपुर पा.पु. योजना, निंभोरा सीम पा.पु. योजना, उदळी खु। पा.पु. योजना, पाल पा.पु. योजना, निमड्या पा.पु. योजना, गारबर्डी पा.पु. योजना, गारखेडा पा.पु. योजना, अंधारमळी पा.पु. योजना या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश तालुका अभियंते यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*