कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना अर्थिक मदत द्या !

0

जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-जळगाव जिल्ह्यात यावर्षी कपाशीचे उत्पादन कमी झाल्याने विदर्भाप्रमाणे शेतकर्‍यांना अर्थिक मदत जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

जळगावची कपाशीचा जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात कपाशीचे उत्पादन दरवर्षापेक्षा कमी प्रमाणात झालेले आहे. त्यातच यंदा कपाशीला चांगला हमी भाव नसल्याने जिल्हयातील शेतकरी अडचणीत आला आहे.

त्यामुळे कापुस उत्पादक शेतकर्‍यांना विदर्भाप्रमाणे हेक्टरी 50 हजार अर्थिक मदत देण्यात यावी तसेच जिल्ह्यात मकाचे उत्पादन देखील कमी झाल्याने मका उत्पादक शेतकरी सुध्दा मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत.

कमी प्रमाणात आलेला मका सुध्दा खरेदी केला जात नसल्याने शेतकी खरेदी विक्री संघात मका खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर), उपसभापती कैलास चौधरी, अनिल भोळे, जि.प सदस्य पवन भिला सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर महाराज, कृउबाचे मुरलीधर पाटील, सुरेश पाटील, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*