मनसे राबविणार शहरात मराठी फलक अभियान

0

जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-जळगाव शहरातील ज्या दुकानांचे, आस्थापनांचे, कारखान्यांचे व बँकाचे फलक इंग्रजी भाषेत असतील त्यांनी फलक मराठी भाषेत करून घ्यावे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरासह जिल्ह्याभरात अभियान राबविणार असल्याचे जिल्हा सचिव अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्राची भाषा मराठी असुन दुकान आस्थाना कायद्यांतर्गत फलक हे मराठीतच असावे असा नियम आहे. अनेक ठिकाणी इंग्रजी भाषेत फलक जागोजागी दिसत असून त्यात प्रामुख्याने मोबाईल दुकाने, खाजगी बँका, शासकीय बँका, विमा कंपन्या यांचे फलक इंग्रजी भाषेत असल्याचे दिसून असून याबाबत मनसेतर्फे त्यांना पत्र देण्यात येणार आहे.

तसेच राष्ट्रीयकृत बँका, शासकी विमा कंपनी येथील विविध प्रकारचे अर्ज हे हिंदी व इंग्रजी भाषेत आहेत.ते सुध्दा मराठी करण्यात यावे असे निवेदन संबंधितांना देण्यात येणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये या मराठी फलक अभियानाला सुरुवात करण्यात येणार असून इंग्रजी फलक असलेल्या शहरातील दुकानदारांनी याची दखल घ्यावी असे आवाहन मनसेतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*