जळगाव कृउबास सभापतीपदी लकी टेलर

0

जळगाव । दि. 21 । प्रतिनिधी-जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर हे विजयी झाले आहे.

त्यामुळे पुन्हा आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपाकडून शिवसेनेकडे आल्या आहे.लकी टेलर यांची निवड होताच समर्थकांनी ढोल ताश्यांचा गजरात जल्लोष केला

जळगाव तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुरुवातीपासून शिवसेनेचे माजी आ.सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व राहिले आहे.

मागील दोन वर्षात कृषी उत्पन्न बाजारसमितीवीवर भाजपाची सत्ता होती. शिवसेनेचे माजी आ. सुरेशदादा जैन यांच्या पुढाकाराने सभापती प्रकाश नारखेडे यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी आज विशेष सभा बोलविण्यात आली होती.त्यानुषंगाने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी भाजपाकडून संचालक प्रभाकर पवार यांनी तर शिवसेनेकडून लक्ष्मण पाटील यांनी अर्ज दाखल केला.

त्यांच्याअर्जावर प्रभाकर पवार यांनी हरकत घेतली होती. यावेळी पवार यांची हरकत फेटाळून लावल्याने भाजपाच्या संचालकांनी मतदान केले नाही. तर 13 संचालकांनी लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांना मतदान केले त्यामुळे त्यांची सभापतीपदी वर्णी लागली.

LEAVE A REPLY

*