भुसावळला पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  येथील शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर नगरसेविका पती राजु सुर्यवंशी व माजी नगरसेवक मोहन निकम यांच्या दोन गटात पुर्व वैमनस्यातून हाणामारी झाल्याची घटना दि. २२ रोजी सायंकाळी घडली.

हा वाद समोरील शहर पोलीस स्थानकात गेला असता याठिकाणी महिला कर्मचारी असल्यामुळे त्यांना न जुमानता थेट पोलीस स्थानकातच दोन्ही गटातील कार्यकर्ते आपसात भिडले.

मात्र महिला कर्मचार्‍यांनी हि बाब लागलीच सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत मोरे यांना कळविल्याने त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत दोन्ही गटातील टवाळखोरांना चांगलाच चोप देऊन त्यांना ताब्यात घेतले.

न्यायालयासमोर असलेल्या ङ्गुटपाथवर दोन गटात वाद निर्माण झाला. हा वाद माजी नगरसेवक व नगरसेविकेच्या पतीच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये होऊन दोन्ही बाजूच्या टवाळखोरांनी थेट शहर पोलीस स्थानकात घुसून ऊसाच्या पेर्‍याने एकमेकांना मारहाण केली.

यावेळी सर्व कर्मचारी हे पथसंचलनात सहभागी झाल्यामुळे पोलीस स्थानकात केवळ एक महिला ठाणे अंमलदार व एक पुरुष कर्मचारी असे दोनच कर्मचारी होते. या वादात महिला कर्मचार्‍यांना देखील धक्काबुक्की झाल्याचे समजते.

रमजान पर्वाच्या पृष्ठभूमीवर सहायक पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी गांधी पुतळा ते लिम्पस क्लबपर्यंत पथसंचलन करीत असतांना सर्व कर्मचारी पथसंचलनात सहभागी होते.

त्यानंतर पोलीस घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोहोचून दोन्ही गटातील लोकांना आवर घातला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती.

LEAVE A REPLY

*