पोलिसांवर दगडफेक करणार्‍या 17 जणांना न्यायालयीन कोठडी

0

जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-बॅग लिफ्टींगच्या घटनेत संशयित असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या एमआयडीसी पोलिसांवर कंजरवाड्यातील जाखनी नगरात दगडफेक करण्यात आली असल्याची घटना दि.20 रोजी रात्री घडली होती.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेवून आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

अनेक जिल्हांमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर व औरंगाबाद येथील बॅग लिफ्टींगच्या गुन्हात संशयित गोपाळ माचरे जाखनी नगरात आला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.त्यानुषंगाने पोलिस त्याठिकाणी गेले असता, जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पोलिस कॉन्स्टेबल सचिन मुंडे यांच्या फिर्यादीवरून उत्तम गुमाने, धीरज भाट, चेतन बाटुंगे, मिली बागडे, पद्मावती गुमाने, सुनिल गोंधळी, आकाश दहेकर,मनिषा माचरे, नुरी कंजर, बबलुबाई कंजर, सलोनी गाटुंगे, बेबीबाई नेतलेकर, दिपा नेतलेकर, दिपा बागडे, मनोज चौधरी, सविताबाई रावत यांच्या विरुध्द भादवी कलम 353, 182,188, 366, 143,147 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संशयितांना पोलिसांनी अटक करून आज न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. तडवी यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

*