नोकरी शोधताय ? मग या चुका टाळा

0
तुम्ही नोकरी शोधत आहात हे तुमच्या ऑफिसमधल्या कोणालाही ( कितीही बेस्ट ङ्ग्रेंड असला तरी) सांगू नका. तुमच्या बॉसला तुम्ही नोकरी सोडत असल्याची कुणकुण लागली तर त्याचा परिणाम तुमच्याशी असलेल्या वागणूकीत नक्कीच होईल.

तुमच्यावर विश्वास दाखवला जाणार नाही आणि तुमच्यावर शेरेबाजी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुख्य म्हणजे नोकरी सोडतानाही नव्या कंपनीत कुठे जॉइन होत आहात हे गुलदस्त्यातच राहू द्या. कारण तुम्ही तिथे जॉईन झाल्याशिवाय त्याची बातमी इतरांना लागू देणे तुमच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते. आजकालच्या कॉम्पीटिशनच्या युगात हे पथ्यं  पाळावे लागते.

नव्या नोकरीसाठी ऍप्लाय करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या. नव्या नोकरीसाठीचा अर्ज नीट शांतपणे वाचा. त्यात नक्की कोणत्या गोष्टींची पूर्तता करायला सांगितली आहे याची यादी करा. त्याला आपण चेकलिस्ट म्हणू शकतो. कोणती डिक्लरेशन द्यायची आहेत? कोणती कागदपत्रे जोडायची आहेत ? याची नीट छाननी करा. अर्ज व्यवस्थित आणि पूर्ण भरा.काहीवेळा पगाराबद्दलची अपेक्षा किंवा राहण्याचं ठिकाण याची माहिती मुद्दामहून भरली जात नाही.

या गोष्टी प्रत्यक्ष मुलाखतीत ठरवल्या जातील अशी अपेक्षा अ्रसते. पण त्या न भरल्याने तुम्ही विश्वासार्ह्य माहिती न दिल्याची नव्या कंपनीची धारणा होऊ शकते. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यात दिलेल्या सूचनांचं पालन करणं.  तुमचा नंबर त्यात लिहीलेला असतो त्यानुसार ते तुम्हाला संपर्क साधतील. त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल.  तुम्ही एखादा इमेल करून संबंधित व्यक्तीला आठवण करून देऊ शकता. भरलेला ङ्गॉर्म पूर्ण चेक करा.

त्यात स्पेलिंग किंवा व्याकरणाच्या चूका नाहीत ना, तुमची माहिती योग्य पध्दतीने दिली गेली आहेना, केवळ करत असलेल्या कामांचा उल्लेेख न करता तुम्ही मिळवलेल्या विशेष प्राविण्याची योग्य माहिती दिली आहे का?तुमची माहिती केवळ पानं भरण्यासाठी तर झालेली नाही ना?तुमचे शिक्षणाविषयीचे डिटेल्स पूर्ण रकान्यात योग्यप्रकारे भरलेआहेत ना? ऍप्लीकेशनला एक कव्हर लेटर जोडलं आहेना?तुमचे संपर्काचे नंबर अणि इमेल ऍड्रेस व्यवस्थित आहेत ना?अशा अनेक गोेष्टी त्यात पहायच्या असतात.

घाईगडबडीतत्यातील काही राहून गेले नाही ना याची खात्री करा.ह्नतुमचं ऍप्लीकेशन खूप सजवू नका. काहीजण वेगवेगळे ङ्गॉंटवापरून, आपल्या अनावश्यक माहितीला खूप महत्व देऊन त्याचीजाहिरात केल्यासारखा अर्ज करतात.

त्यातून कंपनीच्या उपयोगाचंकाहीच हाती लागत नाही. त्यामुळे मुद्देसूद माहिती लिहीणं आणिती योग्य प्रकारे सादर करणं यावर भर द्या.अशा सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा ऍप्लीकेशनतुमचं चांगलं इंप्रेशन पाडण्याचं निम्मं काम करेल.

LEAVE A REPLY

*