विवोचा २४ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मोबाईल फोन

0
विवोच्या नव्या व्ही-७ मोबाईलला २४ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून यात नवीन दर्जदार वैशिष्टये देखील कंपनीकडून देण्यात आली आहे.

विवोचा नवा व्ही -७ मोबाईल भारतात १८ हजार ३०० रुपयांत उपलब्ध असून ग्राहकांनी याला चांगलीच पसंती दिली आहे. या मोबाईचा सेल्फी कॅमेरा २४ मेगापिक्सलचा असल्याने अवघ्या काही दिवसात विवो व्ही -७ ला ग्राहकांमधून अधिक मागणी दिसून येत आहे.

सोनेरी आणि मॅट ब्लॅक रंगांमध्ये विवो व्ही-७ हँडसेट उपलब्ध आहे. ५.७ इंची एचडी आयपी डिस्प्ले मोबाईलला देण्यात आला असून यात ४५०चा प्रोसेसर देण्यात आला आहे.विवो व्ही-७ स्मार्टफोनला ४ जीबी रॅम कंपनीकडून देण्यात आली आहे.

२४ मेगापिक्सल फ्रंट कॅमेर्‍यामुळे चांदलाईट ग्लो सेल्फी काढण्यात छायाचित्र अतिशय स्पष्टपणे दिसणार आहे. या नव्या विवो व्ही-७ स्मार्टफोनला इनबिल्ट स्टोरेज ३२ जीबी आहे आणि आवश्यक असल्यास २५६ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्ड वापरात येणार आहे. या मोबाईलचा बॅटरी बॅकअप देखील चांगला असून ३ हजार ऍम्पीयरची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*