हुनरचा वॉटरप्ले टॅबलेट

0
हुनर कंपनीने नवा ७ एक्स वॉटरप्ले टॅबलेट स्मार्टफोन बाजारात दाखल झाला असून या टॅबलेटला ६ हजार ६०० एमएएचची बॅटरी कंपनीकडून देण्यात आली आहे.

हुनरचा ७ एक्स टॅब्लेट आयपी ६७ प्रमाणपत्रासह प्रमाणित असून नवीन वॉटरप्लेट टॅब्लेट आता सोनीच्या दुसर्‍या वॉटरप्रतिरोधक टॅबलेटच्या यादीत सामील झाला आहे. हुनर वॉटरप्ले टॅबलेटला वाय-फाय, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. वॉटरप्ले टॅबलेट स्मार्टफोन तीन वेगवेगळया प्रकारात उपलब्ध आहे.

हा टॅबलेट २० हजार, २४ हजार, २६ हजार ५०० रुपयांत अनुक्रमे उपलब्ध आहे. या टॅबलेटमध्ये ६५९ प्रोसेसर असून यात २५६ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डद्वारे वापरता येणार आहे. या टॅबलेटमध्ये ६ हजार ६०० एमएच बॅटरी देण्यात आली असल्याने टॅबलेट अधिक जलद पध्दतीने चार्जिंग होवू शकतो.

त्यामुळे टॅबलेटचा बॅटरी बॉकअप देखील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

टॅब्लेटच्या समोर फिंगरप्रिंट सेन्सर आहे वॉटरप्लेमध्ये हार्मोन कार्डॉन ऑडिओ स्पीकर देण्यात आला आहे. हा टॅबलेट रॉकेल आणि पांढरे चमकदार सोनेरी रंगात बाजारात उपलब्ध असून ग्राहकांनी याला चांगलीच पसंती दिली आहे.

LEAVE A REPLY

*