बोसचे वॉटरप्रुफ ब्ल्यु-टुथ स्पीकर्स

0
बोस कंपनीने साऊंडलिंक रिव्हॉल्व्ह आणि रिव्हॉल्व्ह प्लस असे दोन वॉटरप्रुफ ब्ल्यु-टुथ स्पीकर्स बाजारात दाखल झाले असून १९ हजार ९०० ते २४ हजार ५०० रुपयांपर्यंत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

ब्ल्यु-टुथ स्पीकर्स कंपनीच्या स्टोअर्समधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. याशिवाय कंपनीच्या संकेतस्थळावरूनही याची खरेदी करता येईल. हे दोन्ही लंबगोलाकार मॉडेल्स ऍल्युमिनियमपासून तयार करण्यात आले आहेत.

यात कंपनीने विकसित केलेल्या नवीन ऍकास्टीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे सर्व दिशांना उत्तम दर्जाच्या ध्वनीचा आनंद लुटता येणार आहे.

यात ३६० अंशातल्या सराऊंड साऊंडचा सपोर्टदेखील कंपनीच्यावतीने देण्यात आला आहे. दोन्ही स्पीकर्स वॉटरप्रुफ असल्याने रफ-टफ वापरही करणे शक्य असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

साऊंडलिंक रिव्हॉल्व्ह आणि रिव्हॉल्व्ह प्लस या दोन्ही मॉडेलमध्ये अनुक्रमे १२ व १६ तासांचा बॅटरी बॅकअप कंपनीकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*