विठ्ठल रखूमाई सोसा.कर्ज फसवणूक प्रकरणी कर्जदार प्रदीप नेहते यांना अटक

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  येथील विठ्ठल रखुमाई को-ऑप. सोसायटीमध्ये संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करुन संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास दि.२० रोजी भुसावळ येथून अटक केली असून या कारवाईने कर्जदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

येथील विठ्ठल रखुमाई को-ऑप. सोसायटीमध्ये संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करुन आरोपी १८४ लेखापरिक्षक यांनी पूर्व लेखापरिक्षण करतांना सदरबाब माहिती असतांनाही लेखापरिक्षणात या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन १ ते १८४ आरोपींनी पतसंस्थेची ११ कोटी ६४ लाख ९७ हजार ५८३ रुपयांचे कर्ज घेवून फसवणूक करण्यासाठी सहकार्य केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी गु.र.नं. ११६/१६, भा.दं.वि.४२०, ४६०,१६५,४६६, ४६७,१२०,१९९ व ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी पथकाने दि.२० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पथकाने शहरात दाखल होत कर्जदार प्रदीप प्रभाकर नेहेते यांना अटक करण्याची कारवाई पोलिस अधिक्षक दत्तात्रेय कराडे, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, प्रभारी उपविभागीय अधिकारी एल.एम.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, पोहेकॉं प्रवीण जगताप, पो.ना.जीवन पाटील, सुनील सोनार, मेहमुद शेख यांच्या पथकाने केली.

दि.२१ रोजी नेहेते यांना न्यायालया हजर करण्यात येणार आहे.तपास पो.नि.आदिनाथ बुधवंत व सहकारी करीत आहे. सव्वा वर्षापूर्वी दाखल गुन्ह्याची आर्थिक गुन्हे शाखेने तपास हाती येताच आरोपींना ताब्यात घेतल्याने पतसंस्थांच्या कर्जदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*