वरणगाव नगररध्यक्षपदासाठी दोघांची उमेदवारी दाखल

0
वरणगाव, ता.भुसावळ | वार्ताहर  :  येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन दाखल करण्यासाठी दि.२० पासून सुरुवात झाली. पाहिल्यादिवशी भाजपाचे दावेदार दोघे उमेदवारांनी अर्ज दाखल केली असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

वरणगाव पालिकेच्या निवडणुकीला अडीच वर्ष पूर्ण होत आहे. यामुळे पुढील अडीच वर्षासाठी निवडणुक प्रकिया सुरु झाली आहे. दि.२० रोजी सकाळी भाजपाकडून पालिका गटनेता सुनील काळे, सुधाकर जावळे यांच्या सौभाग्यवती सौ.रोहिणी जावळे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अद्यापर्यंत नामनिर्देशन दाखल झाले नाही.मिळालेल्या माहितीनुसार आज दि.२१ रोजी विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*