नराधम मुख्याध्यापकास चार दिवस पोलीस कोठडी

0
वरणगाव |  वार्ताहर :  तालुक्यातील बोहर्डी बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विदयार्थिनींवर बाल लैगीक अत्याचार करणार्‍या मुख्याध्यापक गणेश चुडामण कोलते याला दि. १९ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री वरणगाव पोलिसांनी अटक केली.

दि.२० रोजी न्यायालायात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोलते हा दोन दिवसांपासून पसार झाला होता. मात्र वरणगाव पोलिसांनी संशयीत मुख्याध्यापकास फैजपुर येथील आसाराम बापू नगरातील भावाच्या घरून अटक करण्यात आली.

आरोपीस भुसावळ विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालायाने दि.२४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास एपीआय जगदीश परदेशी करित आहे.

LEAVE A REPLY

*