कोरपावली ग्रा.पं.त साडेआठ लाखांचा अपहार : तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
यावल |  प्रतिनिधी :  जानेवारी १६ ते जून १६ च्या दरम्यान १४ व्या वित्त आयोगातून ग्रामविकास निधीतील ८ लाख ४६ हजार ५०० रूपयांचा अपहार प्रकरणी कोरपावली ता.यावल ग्रा.पं.च्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांविरूध्द यावल पं.स. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीचे १४ व्या वित्त आयोगातील तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे यांनी पतीचे नावे १ लाख ५५ हजार रूपये बँक खात्यातून काढून १४ व्या वित्त आयोगातील रकमेतील या पैशांची किर्द बुकाला न नोंदविता परस्पर खर्च केला.

शासनाने नेमुन दिलेल्या कामावर हि रक्कम न वापरता स्वतःच्या ङ्गायद्यासाठी सदर रकमा स्वतः खर्च केल्या. तसेच आरोपी क्रमांक दोन तत्कालीन ग्रामसेवक सुनिल चिंतामण पाटील यांनी सरपंच सविता संदीप जावळे यांच्याशी संगनमत करून ८ लाख ४६ हजार ५०० एवढी रक्कमेची किर्द बुकात नोंद केली नाही.

शासनाकडून प्राप्त अनुदानाची रक्कम स्वतःच्या ङ्गायद्यासाठी वापरून एवढ्या रूपयांची ङ्गसवणूक व अपहार केल्याचे ग्रा.पं. विस्तार अधिकारी संजय तुळशिराम मोरे यांच्या निदर्शनास आल्याने याबाबत मोरे यांनी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविला होता.

त्यानुसार संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन सरपंच सविता जावळे व ग्रामसेवक सुनिल पाटील यांच्या विरूध्द यावल पोलिसात भाग ५ गु.र.नं. १३५/१७ भा.दं.वि. कलम ४२०, ४०८, १२०ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय योगेश तांदळे करित आहे.

LEAVE A REPLY

*