शिक्षणाधिकारी महाजन आर.आर.शाळेचे प्रशासक

0

जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.

प्रशासक म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष अरविंद लाठी यांच्याकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून शाळेतील मुख्याध्यापकांसह 68 शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

या प्रकाराची शिक्षण विभागाने दखल घेवून शिक्षकांसह संस्थाचालक यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले होते. आज माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची प्रशासक म्हणून तर सल्लागार मंडळातील सदस्य म्हणून राज्य शिक्षण पुरस्कारप्राप्त पी.एम.जंगले, पल्लवी मिलींद जोशी व गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*