शासकीय योजनांचे अनुदान आता घरपोच

0

नाशिक । दि.20 । प्रतिनिधी-शासनाच्या विविध योजनांचे अनुदान खात्यात जमा झाल्यानंतर आता हे अनुदान थेट आपल्या घरी पोस्टमनमार्फत पोहोचवले जाणार आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी दिली.

नाशिक येथे पोस्ट विभागाच्या क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, पोस्टाची लवकरच बँक सुरू होत आहे.

शासनाच्या विविध योजनांचे अनुदान आता थेट खात्यावर जमा केले जाते. सामाजिक अर्थ योजना आणि विशेष सहाय्य योजनेंतर्गत असलेल्या विविध योजनांतर्गत सरकारचे अनुदान दरमहा किंवा एकरकमी स्वरुपात मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असो अथवा निराधार, वृद्ध, विधवा, अपंगांच्या योजना, कृषी योजनांचे अनुदान यांसारख्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यातच जमा केले जाते.

मात्र अनेक वेळा अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना मोठ्या दिव्यातून जावे लागते. अनेक वेळा सरकारी कार्यालयांच्या, बँकांच्या खेटा माराव्या लागतात.

मात्र पोस्टामार्फत आपली सेवा अधिक गतिशील आणि लोकाभिमुख करण्यासाठी लाभार्थ्यांना थेट घरपोच अनुदानाची रक्कम पोहोचवली जाणार आहे.

मात्र याकरिता नागरिकांचे पोस्टात खाते असणे आवश्यक आहे. अगदी पाचशे रुपयांत पोस्टात खाते उघडता येणार आहे. या योजनेकरिता पोस्टमनला प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोस्ट बँकेच्या राज्यात 42 शाखा
जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे जाळे चालवणार्‍या भारतीय पोस्ट खात्याची पेमेंट बँक मार्च महिन्यापासून अस्तित्वात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने पोस्ट बँकेला अन्य सार्वजनिक बँकांच्या ङ्गएटीएममशी जोडून घेण्याची परवानगी देऊ केली आहे.

त्यामुळे ङ्गपोस्ट पेमेंट बँकेफच्या ग्राहकांना सार्वजनिक बँकांच्या ङ्गएटीएमम सेवेचा वापर करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे ग्राहकांना टपाल कार्यालयातील त्यांच्या खात्यातून ठराविक रक्कम अन्य कोणत्याही बँकेत हस्तांतर करता येणार आहे.

राज्यात नाशिकसह 42 शाखा मार्चअखेर सुरू करण्यात येणार असून या बँकेमार्फत कोअर बँकिंग सॉफ्टवेअर, एटीएम आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. मात्र सध्या कर्ज सुविधा दिल्या जाणार नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*